तारण दिलेली मालमत्ता परस्पर विक्री केलेप्रकरणी कर्जदार व जामीनदार यांचे विरुध्द गुन्हा दाखल करणे बाबत न्यायालयाने दिले पोलिस स्टेशनला आदेश
लातूर- (दैनिक विश्वउदय ) येथील रत्नेश्वर पतसंस्थेस तारण दिलेली मालमत्ता परस्पर विक्री केलेमुळे कर्जदार व जामीनदार यांचे विरुध्द गुन्हा दाखल करणे बाबत न्यायालयाने दिले पोलिस स्टेशनला आदेश या बाबत थोडक्यात हकीकत अशी की लातूर येथील
रत्नेश्वर नागरी सहकारी पतसंस्था म. गंजगोलाई या पतसंस्थेने सन २०१३ मध्ये ईरफान फारूखाँ पठाण यांना रू. ५०,०००/- कर्ज दिले.कर्जाच्या तारणापोटी जामीनदार गफार रज्जाकसाब उर्फ रज्जाकमियाँ शेख यांचे मालकीची श्रीकृष्ण नगर, लातूर येथील मनपा मिळकत नं. आर-७/१८४१/१ ही मिळकत रत्नेश्वर पतसंस्थेस तारण तारण ठेवली. व घेतलेले कर्ज थकबाकीत गेल्यामुळे संस्थेने कर्जदार व जामीनदार यांचे विरूध्द म.स.सं. अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये प्रकरण दाखलकरून वसुली दाखला मिळवला व सदरील दाखल्या आधारे संस्थेचे वसुली अधिकारी यांनी कर्जदार ईरफान फारूखाँ पठाण आणि जामीनदार गफार रज्जाकसाब उर्फ रज्जाकमियाँ शेख व फारूखाँ मज्जीदखाँ पठाण यांचे विरूध्द योग्य ती कायदेशिर कार्यवाही करून सदरील मिळकत जप्त करणे कामी जायमोक्यावर गेले असता सदरील मिळकत जामीनदार श्री. गफार रज्जाकसाब उर्फ रज्जाकमियाँ शेख व सौ. साहेरा अब्दुल गफार शेख यांनी संस्थेचे कर्जदार व इतर जामीनदार यांच्या संगनमताने रत्नेश्वर पतसंस्थेच्या परस्पर व संस्थेचे कर्ज बुडविण्याच्या दुष्ट हेतूने बेकायदेशिर रित्या सदर मिळकत पतसंस्थेच्या परस्पर विक्री केली. व तारण मिळकत बेकायदेशिर रित्या व जाणूनबुजून श्री. चाँदपाशा रियाजोद्दीन बागवान यांनी खरेदी घेतल्याचे आढळुन आले, त्यामुळे पतसंस्थेचे सहसेक्रेटरी अॅड. आत्मलिंग व्ही. गोरे यांनी मे. लातूर येथील न्यायालयात कलम १२०बी, १९९, २००, ४१७, ४२०, ४६५, ४६७, सह ३४ अन्वये फिर्याद दाखल केली. न्यायालयाने फिर्यादीने दाखल केलेल्या कागदापत्रे व पुराव्या आधारे तारण दिलेली मालमत्ता बेकायदेशिर रित्या विक्री करून संस्थेची फसवणुक केल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले त्यावेळी मा. न्यायाधिश ज्योती जे. माने, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लातूर यांनी १) ईरफान फारूखाँ पठाण, रा. इस्लामपुरा लातूर, २) गफार रज्जाकसाब उर्फ रज्जाकमियाँ शेख, रा. श्रीकृष्ण नगर लातूर, ३) फारूखाँ मज्जीदखाँ पठाण, रा. इस्लामपुरा लातूर, ४) सौ. साहेरा अब्दुलगफार शेख रा. श्रीकृष्ण नगर लातूर व ५) श्री. चाँदपाशा रियाजोद्दीन बागवान रा. श्रीकृष्ण नगर लातूर यांचे विरूध्द गुन्हा नोंद करून चौकशी करण्याचे आदेश कलम १५६ (३) सीआर.पी.सी. प्रमाणे पी. एस. ओ. शिवाजी नगर पोलिस स्टेशन लातूर यांना दिले आहेत. फिर्यादी संस्थेच्या वतीने अॅड. महेंद्रकुमार चव्हाण यांनी काम पाहिले आणि त्यांना अॅड. संजय घुले व अॅड. अमर बाहेती यांनी सहकार्य केले.