महावितरणच्या खाजगी करणाच्या विरोधात पुकारलेल्या संपाला लातूर जिल्ह्यात देखील सुरुवात.
लातूर( दैनिक विश्वउदय ):-महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खाजगी करणाच्या विरोधात पुकारलेल्या संपाला लातूर जिल्ह्यात देखील सुरुवात झाली. दरम्यान जिल्ह्यातील या संपाचे परिणाम देखील पाहायला मिळत असून ग्रामीण भागासह लातूर शहरा सह अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे चित्र आहे. लातूर निलंगा उदगीर या तीनही विभागातील अनेक भागात कर्मचारी संपात सहभागी झालेत त्यामुळे या संपाचा फटका गोरगरिबा सह व्यापारी यांना बसला आहे. कंत्राटी कर्मचारी सुद्धा संपात सहभागी झाल्याचे दिसत आहे. सकाळपासूनच बहुतांश विविध भागात वीजपुरवठा नसल्यामुळे अनेकांच्या कामावर याचा परिणाम होत आहे. सकाळपासूनच अनेक हॉटेलमधील कामे थांबली आहेत, तर याचा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना देखील बसला आहे लातूरच्या महावितरण कंपनीच्या जनसंपर्क विभागात याबाबत माहिती विचारली असता संपला 100% यश आला असल्याचं निर्लज्जपणे सांगण्यात आलं आहे.जनतेला वेटीस धरत असल्यामुळे उलट महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या वर्तना बाबत व सरकारच्या खाजगीकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.