लातूर शहरात कचरा जाळणा-या विरुध्द दंडात्मक कार्यवाही व गुन्हा दाखल.


 


     लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिका हद्दीमध्ये मागील 8 दिवसांपासून ठिकठिकानी कचरा जाळण्याचे प्रकार वर्तमानपत्र व सोशल मिडीया माध्यमातून येत आहेत. रिंग रोड परिसरात कचरा जाळण्या-या एका नागरीका विरुध्द 5 हजार रु. दंड करण्यात आला आहे तसेच गांधी चौक पोलीस स्टेशन समोर कचरा जाळणा-या अज्ञात व्यक्ति विरुध्द व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनपा आयुक्त श्री. बाबासाहेब मनोहरे यांनी सर्व क्षेत्रिय अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांची आठवा बैठक घेऊन लातूर शहरात कचरा जाळण्या-या नागरीक यांचे विरुद्ध पोलीस गुन्हे नोंद



 करण्यासाठी त्या त्या भागातील स्वच्छता निरीक्षक यांना प्राधिकृत केले असुन शहरामध्ये ज्या भागात कचरा जाळण्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी संबंधीत स्वच्छता निरीक्षक यांच्या निदर्शनात आणुन द्यावे अथवा श्री.सिध्दनाथ मोरे स्वच्छता निरीक्षक 8530958050 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले



Comments