महावितरणचा सहायक अभियंता गोविंद सर्जे लाच घेताना अटकेत

 महावितरणचा सहायक अभियंता गोविंद सर्जे लाच घेताना अटकेत


लातूर : सोलार इंस्टॉलेशनच्या प्रोजेक्टला तांत्रीक योग्यता (टेक्नीकल फिजीबिलीटी) देण्यासाठी २२ हजार रुपयांची लाच स्विकारताना शहरातील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेला सहायक अभियंता गोविंद तुकाराम सर्जे याला बुधवारी सायंकाळी रंगेहात अटक करण्यात आली. या संदर्भात गांधीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शहरातील साळे गल्ली परिसरात शहर क्र ५ या महावितरण कार्यालयात सहायक अभियंता या पदावर गोविंद तुकाराम सर्जे ( वय ४६) हा मागील अनेक वर्षांपासून


कार्यरत आहे. तक्रारकर्त्याचा सोलार इंस्टॉलेशनचा व्यवसाय आहे. त्याने सध्या सोलार इंस्टॉलेशनचे एक काम हाती घेतले आहे. या संदर्भातच्या प्रोजेक्टला टेक्नीकल फिजीबिलीटी ( तांत्रीक योग्यता) देण्याचे काम सर्जे याच्याकडे होते. त्याने या कामासाठी तक्रारकर्त्याकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २२ हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु, काम नियमात असल्यामुळे तक्रारकर्त्याने लाच देण्यास नकार दिला आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे महावितरण कार्यालयात सापळा लावण्यात आला. बुधवारी » पान २ वर(दि. १५) सदर लाचेची रक्कम घेवून तक्रारकर्त्याने त्याच्या कार्यालयात लाचेचे २२ हजार रुपये देताच त्याने ते पंचासमक्ष स्विकारले आणि त्याला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ अटक करण्यात आली. या संदर्भात गांधीचौक पोलिसांत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवटी सर्जेचा घडा भरलाच

........................


महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या गोविंद सर्जे याच्या विरोधात अनेकांनी यापूर्वीही संताप व्यक्त केला होता. प्रत्येक कामाला पैसे घेतल्याशिवाय तो काम करीत नसे अशा तक्रारी अनेकदा ग्राहकांकडून ऐकण्यास येत होत्या. ग्राहकांना बोलण्याची उर्मट पध्दत, पैसे घेतल्याशिवाय सामान्यांचे कामे न करने या प्रकारांचा कळस झाल्यानंतर अखेर बुधवारी सर्जे हा अँटिकरप्शनच्या जाळ्यात अडकला. ही घटना सोशल माध्यमांमध्ये पसरताच या कारवाईचे. अनेकांनी स्वागत केले.

Comments