लातूर जिल्हा वकील मंडळाची उद्या निवडणूक मावळते पदाधिकारी सादर करणार आज लेखाजोखा!
प्रतिनिधी/दैनिक विश्वउदय (उदय वडवाले ):-
२०२३ - २४ या सालासाठी लातूर जिल्हा वकील मंडळाची निवडणूक मंगळवार दि.११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया नुसार होणार आहे.या निवडणुकीसाठी उमेदवार आपआपल्या परीने व्हाट्सअप, फेसबुक व अन्य सोशल मिडिया सह प्रिंट मिडियाचा आधार घेऊन प्रचार यंत्रणा राबवून वकीलमंडळींची भेटीघाटी घेत आहेत.लातूर वकील मंडळाची निवडणूक हि अत्यंत प्रतिष्ठेची व चूरसेची मानली जाते.आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मावळत्या पदाधिकारी कडून आपल्या कार्याचा लेखाजोखा वकील मंडळाच्या सभागृहात सर्वसाधारण सभेत सादर होणार आहे .मावळते अध्यक्ष ॲड.विठ्ठल देशपांडे हे आपल्या कार्यकाळात केलेल्या कार्याची माहिती देणार आहेत.आता पर्यंत दैनिकाच्या हाती आलेल्या माहिती नुसार अध्यक्षपदी अॅड. राजेंद्र पाटीलउ पाध्यक्षपदी अॅड. संजय जगदाळेसचिव पदी अॅड. प्रदीपसिंह गंगणेसहसचिवपदी-अॅड. यशवंत चव्हाणग्रं थालय सचिवपदी -अॅड. मनोज जाधवको षधक्षपदी अॅड. अमोल पोतदार हे अधिकृत रित्या अॅड. राजेंद्र पाटील यांच्या पॅनल मधून आपले नशिब अजमावत आहेत तर प्रतिस्पर्धी म्हणून अध्यक्षपदी - अॅड. महेश ए. बामनकरउ पाध्यक्षपदी -अॅड. गजानन यु. चाकूरकर सचिवपदी- अॅड. चंद्रकांत एस. मेटेसहसचिवपदी-अॅड. गोपाळ एस. बुरबुरेकोषाध्यक्षपदी -अॅड. सुभेदार एम. मादळेग्रं थालय सचिवपदी- अॅड. संतोष आर. सोनी हे निवडणुकी च्या रिंगणात उभे आहेत.आजचा एक दिवस निवडणुकी च्या रिंगणात उभे राहण्याचा शिल्लक दिवस आहे. लोकसभेची निवडणूक आसो की स्थानिक पातळीवरची निवडणूक आसो जिकडे तिकडे प्रचार यंत्रणामध्ये जातीपातीच्या मतदाराला लक्षकरून निवडणूक उमेदवार कडून लढवली जाते. २०२३ - २४ या होणाऱ्या वकीलबार निवडणूक मध्ये यामुळे किती हौशी गौशी निवडणूकी च्या रींगणात उभे राहतील हे पाहण्यास मिळणार आहे. प्रथम:च सलग पाच वर्ष जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्षपद भूषवलेले व सध्याला महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य असलेले अॅड.अण्णाराव पाटील यांनी जातीपाती विरअहित मतदान प्रक्रिया पार पडावी या उदात हेतूने सर्व जाती धर्माच्या उमेदवारास वकील बार मंडळाचा अध्यक्ष होता यावा. संविधाना नुसार सर्वाना संधी मिळावी हया हेतूने यावेळी अध्यक्षपदा करिता लिंगायत समाजाला संधी दिली. यामुळेच वकील बार मंडळाच्या या निवडणुकीमध्ये प्रथम:च 2 उमेदवार लिंगायत समाजाचे प्रतिस्पर्धी उमेदवार होत निवडणुकीच्या रिंगनात उभे आहेत हे या निवडणुकीचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे.